Ad will apear here
Next
‘संचेती’तर्फे मोफत अस्थिरोग तपासणी शिबिर
पुणे : संचेती हॉस्पिटलतर्फे जागतिक पितृदिनानिमित्त १६ जूनपासून ‘पितृदेवो भव सप्ताह’ आयोजित करण्यात आला होता. या अभिनव उपक्रमामध्ये वडील असणाऱ्या सर्व पुरुषांना त्यांच्या आजाराबद्दल मोफत सल्ला व उपचार दिले गेले. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून नोंदणी करून लोकांनी या उपक्रमाचा फायदा घेतला.

लोकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद लक्षात घेऊन संचेती हॉस्पिटलने २३ जून रोजी हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थिरोग तपासणी व उपचार शिबिर राबवण्यात येणार आहे. हे शिबिर शहराच्या मध्यभागी असणाऱ्या संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर येथे असणार असून, सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत आयोजित केले आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याचशा आजारांकडे कानाडोळा केला जातो. गुडघेदुखी, पाठदुखी, सांधेदुखी, सांधे आखडणे, संधिवात, मणक्यांचे जुने आजार, पाय सुजणे किंवा मुंग्या येणे, स्पोर्ट इंज्युरी अशा व अजूनही वेगळ्या हाडांच्या विकारांनी बाधित असण्याऱ्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचेती हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.

संचेती हॉस्पिटल गेल्या ५३ वर्षांपासून पुण्यामधील व देशविदेशातल्या अनेक रुग्णांना आरोग्य सुविधा देत असल्यामुळे आज आशिया खंडातील सर्वात मोठे हाडांचे हॉस्पिटल म्हणून ओळखले जाते.

शिबिराविषयी :
दिवस
: २३ जून २०१८
वेळ : सकाळी नऊ ते दुपारी एक
स्थळ : संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर, पुणे.
नावनोंदणीसाठी संपर्क : ८८८८८ ०८८३९
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZOFBP
Similar Posts
‘सेरेब्रल पाल्सीच्या उपचारांमध्ये शस्त्रक्रिया, फिजिओथेरपी महत्त्वपूर्ण’ पुणे : ‘सेरेब्रल पाल्सीच्या उपचारामध्ये आर्थोपेडिक शस्त्रक्रिया आणि फिजिओथेरपीची महत्त्वाची भूमिका असते. यामुळे शरीराची हालचाल सुधारण्यास मदत होते’, असे मत संचेती हॉस्पिटलमधील पेडियाट्रिक आर्थोपेडिक विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पटवर्धन यांनी व्यक्त केले.
पुण्यात टेनएक्स ट्रू रायडर्स हेल्मेट राइडला उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे : झेनेक्स इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड व पुणे वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रिमियर ग्रुप, रोटरी क्लब ऑफ आकुर्डी आणि संचेती हॉस्पिटल यांच्या सहयोगाने आयोजित टेनएक्स ट्रू रायडर्स हेल्मेट राइडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रस्ता सुरक्षा आणि हेल्मेटचा वापर याबद्दल जनजागृती करण्याच्या हेतूने या राइडचे आयोजन करण्यात आले होते
डॉ. पराग संचेती यांना ‘रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अॅवॉर्ड’ प्रदान पुणे : ‘रोटरी क्लब ऑफ कोथरूड’तर्फे आघाडीचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ व संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. पराग संचेती यांचा ‘रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अॅवॉर्ड’ प्रदान करून सन्मान करण्यात आला.
संचेती हॉस्पिटलतर्फे मोफत मणका तपासणी शिबिर पुणे : संचेती हॉस्पिटल व हीलीयोस - द फिजिओ एक्स्पर्टसतर्फे रविवारी, २८ एप्रिल रोजी संध्याकाळी चार ते आठ या वेळेत मोफत मणका विकार तपासणी शिबिराचे (स्पाईन कॅंप) आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्वांना मोफत तपासणी व सल्ला मार्गदर्शन मिळणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language